सामाजिक कार्यकर्त्या सौ., ज्योती पाटील यांना महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर!

 सामाजिक कार्यकर्त्या सौ., ज्योती पाटील यांना महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर!


ठाणे -नवी मुंबईतील प्रतिष्ठित अशोकपुष्पचा यंदाचा महिला उद्योजिका पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सौ.ज्योती राजकांत पाटील यांना जाहिर झाला आहे.


तन्वी इंटरप्रायजेस च्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून सौ ज्योती पाटील यांनी दिवा शहरात आपल्या व्यवसायाचे जाळे निर्माण केले असून विविध कंपन्यांच्या एजन्सी,मसाले पदार्थ व मिनरल वॉटर क्षेत्रात ज्योती पाटील यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून दिव्यात महिला उद्योजिका म्हणून त्या नावारूपाला आल्या आहेत.तन्वी इंटरप्रायजेस आणि दक्ष इंटरप्रायजेस च्या माध्यमातून ज्योती पाटील यांनी अनेक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत नवी मुंबईतील अशोकपुष्प प्रकाशनने ज्योती पाटील यांना महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर केला आहे.कोरोनाचे संकट दूर होताच सर्व नियम पाळून नवी मुंबई येथे ज्योती पाटील यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.