शेलू पूरग्रस्तांना अक्षयपात्र व सत्येमेव जयते ची मदत
ठाणे - कोरोना महामारी नंतर आता महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. सगळीकडे आहाकार माजला आहे. पुरामध्ये शेलू जिल्हा रायगड येथील जवळ जवळ सर्वच घरातील सर्व साहित्य वाहून गेले. पूरग्रस्तांची जगावं की मरावं अशी अवस्था झाली. त्यावेळी अक्षय पात्र फाउंडेशन आणि सत्येमेव जयते प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने के. बी. के. नगर शेलू मध्ये शनिवार दि 24-07-2021 रोजी उत्कृष्ट दर्जाचे अन्न (पुलाव, दाल ) वाटपाचे पुण्यकर्म केले. या उपक्रमात अक्षयपात्र फाउंडेशनचे शेफ सतीश पाटील, दिगंबर सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पूरग्रस्तांना मदत करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सत्येमेव जयते प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सुनिलजी बोरनाक, संदीप मेंगाणे,सतीश पाटील, सूरज देसाई, अविनाश लोंढे, रवी वारके, विनोद वारके, प्रवीण वारके,पांडुरंग पाटील,सत्येमेव जयते प्रतिष्ठानचे पदाधिकारी व इतर सदस्यांनी सहकार्य केले.