उपजिल्हा रुग्णालय पाटोद्यात करण्यात यावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन लढा उभारणार - राजु भैय्या जाधव
पाटोदा - पाटोदा हे तालुक्याचे ठीकाण असुन शिरुर व आष्टी तालुक्याच्या मध्य स्थानी असुन पाटोदा येथे उप जिल्हा रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी पाटोदा नगरपंचायत सभापती राजु भैय्या जाधव यांनी केली आहे असून पाटोदा हे तालुक्याचे ठीकाण असुन येथे ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नसुन रुग्णांना बीडला किंवा अहमदनगरला जावे लागते ही रुग्णांसाठी खुप गंभीर बाब असून रुग्णालयात कुठलीच सोय नसुन पाटोदा येथे उप जिल्हा रुग्णालय होणे हे काळाची गरज असुन शासनाने पाटोदेकरांच्या मागणीची दखल घ्यावा नसता पाटोदा येथे उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे यासाठी तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना घेऊन मोठा लढा उभारण्यात येईल अशी मागणी पाटोदा नगरपंचायत सभापती राजु भैय्या जाधव यांनी केली आहे.