पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला ॲम्बुलन्स भेट
लोकार्पण सोहळा संपन्न
पाटोदा - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी १०:३० वा. आमदार सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते अत्याधुनिक सुविधांनी युक्त ॲम्बुलन्स पाटोदा रुग्णालयाला भेट देत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला अँम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनेते सुरेश (अण्णा) धस यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करताना आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश (दादा) कवठेकर, आरोग्य व शिक्षण सभापती राजू (भैय्या) जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.