पालकमंत्री साहेब पिक कर्जासाठी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घ्या. भाई विष्णुपंत घोलप
पाटोदा :- बीड जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या जुन महिन्यात पुर्ण झाल्या आहेत. शेतकरी नागरट, मोगडा, पाळी, पेरणी, खत - बियाणे घेण्यासाठी आर्थिक अडचणीत असताना खरीप पिक कर्ज मे, जुन मध्ये वाटप होणे गरजेचे असतांना जुलै महिना सुध्दा संपत आला आहे. खरीप पिक कर्जासाठी शासनाचे नेमके उद्दीष्ट काय ? ते बँकांनी का पुर्ण केले नाही. शेतकरी आर्थिक संकटात असतांना त्याला कर्ज द्यायचे आहे दान नाही. बँक प्रशासन नेमके असे का वागत आहे, किंवा शासनाचे धोरणच असे आहे काय ? खरीपाचे पीक कर्ज रब्बीच्या पेरणी नंतर द्यायचे का ? हे आढावा बैठकीत जनतेच्या समोर एकदा कळुन द्या. पालकमंत्री साहेब शेतकरी काय आर्थिक अडचणीत आहे ते फक्त त्याच्या जिवालाच माहित असते, त्या साठी पालकमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज कसे तात्काळ वाटप होईल याची पालकमंत्री म्हणून दक्षता घ्यावी. अशी नम्र विनंती शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.